AurangabadCrime : मोटरसायकल चोरीचा छंद जोपासणारा मजूर सातारा पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद- छंद म्हणून मोटरसायकलचे हॅंडललाॅक झटक्यात तोडून पेट्रोलसंपेपर्यंत फिरणारा नवा चोर सातारा पोलिसांनी ७५ हजार रु. च्या तीन मोटरसायकलसहित अटक केला.
प्रविण प्रकाश काकडे(३८) रा. सातारागाव असे नव्या चोरट्याचे नाव आहे.गेल्या दीड महिन्यापासुन प्रविणला मोटरसायकल चोरीचा छंद जडला सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बेस्ट प्राईज माॅल आणि साई हाॅटेल समोरुन दोन मोटरसायकल तर आठ दिवसांपूर्वी सातारागावातून आकाश दाभाडे याची मोटरसायकल चोरली होती. या चोरीचा तपास पोलिस कर्मचारी वैष्णव करंत होते. दरम्यान खबर्याने त्यांना माहिती दिली की, आज२२/०९रोजी सकाळी ११वा. चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी एक आसम येत आहे.त्यानुसार पीएसआय वडणे, एएसआय मच्छींद्र ससाणे,पी.आर. ससाणे, एस.बी.सानप यांनी गोदावरी हाॅटेलसमोर सापळा लावला.त्याठिकाणी संशयित प्रविण काकडे चोरीच्या मोटरसायकलसहित उभा होता.त्याला ताब्यात घेत सातारा पोलिस ठाण्यात आणले.विश्र्वासात घेत चौकशी केली असता आरोपी काकडे ने दीड महिन्यात तीन मोटरसायकल चोरल्याचा जबाब दिला. पोलिसांनी तिन्ही मोटरसायकल जप्त केल्या आहेत
वरील कारवाई पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळै यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिस करत आहेत.