MumbaiNewsUpdate : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून ८ जणांचा मृत्यू , बचाव कार्य जारी ….

#WATCH Maharashtra: Rescue operation by NDRF (National Disaster Response Force) underway at the site of building collapse in Bhiwandi, Thane.
Eight people have lost their lives in the incident which took place earlier today. pic.twitter.com/dFvXwhHPH3
— ANI (@ANI) September 21, 2020
भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंटमध्ये आज पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या भयंकर घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक हि इमारत कोसळली.
इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, परिसरातील सर्तक नागरिकांमुळे २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सकाळी साडेसातपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आतापर्यंत ओळख पटलेल्या मृत व्यक्तींमध्ये १) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष), २) फायजा खुरेशी(पु/५वर्ष), ३) आयशा खुरेशी(स्री/७वर्ष), ४) बब्बू(पु/२७वर्ष) यांचा समावेश आहे.
#UPDATE Five people have lost their lives in the Bhiwandi building collapse incident: Thane Municipal Corporation PRO #Maharashtra https://t.co/jrpBvvtoCI pic.twitter.com/yRpkUiFZZd
— ANI (@ANI) September 21, 2020