MaharshtraCrimeUpdate : अश्लील चित्रफीत बनवून ३० लाखाची खंडणी मागणारे गजाआड , २० लाख घेऊनही आवरला नाही मोह !!!

एका महिलेची बनावट अश्लील चित्रफीत तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ३० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापैकी २० लाखांची रक्कम पीडित महिलेकडून उकळल्यानंतर, त्रस्त झालेल्या पीडितेने पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पुसद शहर पोलिसांनी दोन महिलांसह एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरव गायकवाड, कमल पाईकराव अशी आरोपीचं नाव असून गौरवच्या घरातील एका महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , पुसद शहरात उदासी वॉर्डात राहणाऱ्या पीडीत महिलेची बनावट अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ तयार करुन आरोपींनी तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. आणि पैसे न दिल्यास सोशल मीडियावर ही छायाचित्र टाकून बदनामी करु अशी धमकीही दिली. ३० लाखांची खंडणी मागितल्यानंतर सदर महिलेने आरोपींना २० लाख रुपये दिले, मात्र यावर आरोपींचं समाधान झालं नाही. दरम्यान आरोपींनी पीडित महिलेला एका निर्जन स्थळी बोलवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पीडित महिलेने पुसद पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.