मराठा आरक्षण : MaharshtraNewsUpdate : राजकारण करणार नाही , आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार बरोबर : देवेंद्र फडणवीस

Advertisements
Advertisements
Spread the love

विरोधी पक्ष नेते बिहारहून परतल्यानंतर त्यांच्याशी बोलू असे मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन दिवस आधी जाहीर केल्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांशी एक बैठक घेऊन चर्चा केली . या बैठकीनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर करताना आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार जे जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे  फडणवीस यांनी म्हटले आहे.

Advertisements

या विषयावर  प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले कि ,  आम्ही विरोधी पक्षाच्यावतीने भूमिका मांडताना  मुख्यमंत्र्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे, ते बहाल करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. आम्ही यामध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही. सरकार कुठं चुकत असेल तर जरुर सरकारला सांगू. परंतु सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ मात्र सरकारने तात्काळ या संदर्भातील कायदेशीर निर्णय केले पाहिजेत. समजा जर सरकारचं मत आहे की, घटनापीठाकडेच गेलं पाहिजे. तर त्याही संदर्भात तात्काळ अर्ज करून  त्या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे, की आता तुम्ही स्थगिती हटवा. नंतर मग इतर आरक्षणाच्या ज्या याचिका आहेत, त्या सोबत अंतिम सुनावणी करा आणि त्यानुसार साधारणपणे  सरकारने आपली भूमिका ठेवलेली आहे.

Advertisements
Advertisements

त्याचबरोबर मुख्यामंत्र्यांच्या समोर आम्ही एक दुसरी गोष्टं प्रकर्षाने मांडली. ती म्हणजे, आता मराठा समाजातील तरुणाईसमोर खूप मोठ्याप्रमाणावर संकट उभे राहिले आहे.  समाजात एक भीतीचं वातावरण आहे. अशावेळी सरकराने या संदर्भात देखील त्यांना आश्वास्तं केलं पाहिजे. एकीकडे आरक्षण कसं बहाल करता येईल, यासाठी प्रयत्न करत असताना, हा जो काही मधला काळ आहे, या काळात मराठा समाजातील तरुणांना महाविद्यालयात प्रवेश मिळाले पाहिजेत. यासाठी आपल्या ज्या संस्था आहेत, यातील जागा वाढवून त्यांचे समायोजन करता येईल का हा प्रयत्न केला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. शिवाय, आमच्या सरकारच्या काळात आम्ही फी प्रतिपुर्तीची योजना आणली होती. तशी योजना आणून त्यांनी कुठेही प्रवेश घेतला, तरी त्यांची फी सरकार भरेल, अशाप्रकारे जशी राजर्षी शाहू महाराज योजना आपण आणली होती. तशी योजना सरकारने तात्काळ सुरू करावी. एकीकडे जर जागा आपण वाढवल्या तर कदाचित ज्यांची संधी आता आरक्षण नसल्याने जाणार आहे. त्या युवकांना ती संधी मिळू शकेल अशा सूचनाही आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!