LoksabhaNewsUpdate : खासदार मीनाक्षी लेखी , अनंतकुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोना ….

Monsoon Session: 17 MPs including Meenakshi Lekhi, Anant Kumar Hegde test positive for COVID-19
Read @ANI Story | https://t.co/3mEZz1vi9e pic.twitter.com/DxTTCxrzTU
— ANI Digital (@ani_digital) September 14, 2020
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली मात्र केंद्र शासनाने अधिवेशनाच्या दरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले असून संसद सदस्यांना कोरून टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे . दरम्यान मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण १७ खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह एकूण १७ जणांचा समावेश आहे. कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
अधिवेशनासाठी आलेल्या सर्व खासदारांना कोरोना किटही देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचं आवरणही लावण्यात आलं आहे. एवढंच नाही तर उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. आज लोकसभेत ३५९ खासदारांची हजेरी होती. पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात जवळपास ३० टक्के खासदारांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह सदस्यांमध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील ४ खासदारांचाही समावेश आहे. तर या आधीच अनेक खासदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यातले अनेक जण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली.