IndiaNewsUpdate : ताजी बातमी : केंद्रीयमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल , श्वास घेण्यासाठी होत होता त्रास ….

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचं आढळलं होतं. उपचारानंतर करोनामुक्त झाल्याने अमित शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री ११ वाजता अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. करोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रुग्णालयाकडून मात्र अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही .
सांगण्यात येत आहे कि , कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्यांचा त्रास कमी होताना दिसत नाही . या आधीही त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत उपचार घेतलेले होते. गेल्या २ ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते . त्यामुळे गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . दरम्यान दि . १४ ऑगस्ट रोजी केलेल्या चाचणीत त्यांचे टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्या नंतर त्यांना पुन्हा ४ दिवसांनी १८ ऑगस्टला पोस्ट-कोविड केयर केंद्रात दाखल करण्यात आले होते . रुग्णालयातूनच त्यांनी आपल्या कार्यालयाचे कामकाज सांभाळले होते. आताही ते काही दिवस रुग्णालयातच थांबतील असे सांगण्यात येत आहे.