IndiaNewsUpdate : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान पुन्हा रुग्णालयात , पक्षाची धुरा चिराग पासवान यांच्याकडे

मुझे विश्वास है कि अपनी युवा सोच से चिराग पार्टी व बिहार को नयी ऊँचाईयों तक ले जाएगा।चिराग के हर फ़ैसले के साथ मैं मज़बूती से खड़ा हूं। मुझे आशा है कि मैं पूर्ण स्वस्थ होकर जल्द ही अपनों के बीच आऊँगा। 3/3
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) September 11, 2020
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान प्रकृती सध्या ठीक नसल्याने त्यांना पुन्हा शुक्रवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी आपल्या अनुपस्थितीत पक्षाची सर्व सूत्रे आपला मुलगा चिराग पासवान याच्याकडे सोपवल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. आपल्या संदेशात पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसंच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान जे निर्णय घेतील, ते अंतिम निर्णय असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आपल्या ट्विटद्वारे माहिती देताना त्यांनी म्हटले आहे कि , ‘करोना संकटकाळात खाद्य मंत्री म्हणून आपली सेवा देण्यासाठी आणि योग्य वेळी खाद्यसामग्री जागेवर पोहचण्यासाठी हरएक प्रयत्न केले. याच दरम्यान तब्येत आणखीन खालावू लागली परंतु, कामात काही अडथळे येऊ नये यासाठी मी रुग्णालयात दाखल होण्याचं टाळलं होतं. परंतु, माझी तब्येत ढासळल्याचं चिरागच्या लक्षात येताच त्याच्या सांगण्यावरून मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे’ . ‘मला आनंद आहे की यावेळी माझा मुलगा चिराग माझ्यासोबत आहे आणि माझी शक्य तेवढी सेवा करत आहे. माझी काळजी घेण्यासोबतच तो पक्षाप्रती असलेली जबाबदारीही योग्य पद्धतीनं पार पाडत आहे. मला विश्वास आहे की आपल्या तरुण विचारांनी चिराग पक्ष आणि बिहारला नव्या उंचीवर घेऊन जाईल. चिरागच्या प्रत्येक निर्णयासोबत मी कणखरपणे उभा आहे. मला आशा आहे की लवकरच बरा होऊन लवकरच आप्तेष्टांजवळ येईल’ असं म्हणत पासवान यांनी आपल्या मुलावर विश्वास व्यक्त केलाय.