CongressNewsUpdate : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल , जाणून घ्या महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण ?

अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत असून मोठ्या खलबतांनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीत पदांची अदलाबदल करण्यात आली आहे . या यादीतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून तसेच प्रभारी पदावरूनही हटवण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राचे तर गुलामनबी आझाद हे हरयाणाचे प्रभारी होते. दरम्यान अजय माकन आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे. मुकुल वासनिक आपल्या पदावर कायम असून त्यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे तर खा. राजीव सातव यांचीही गुजरातची जबाबदारी कायम आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी -वाड्रा यांच्यावरच असून महाराष्ट्राची जबादारी एच . के . पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सविस्तर यादी पुढील प्रमाणे….
Congress appoints general secretaries and in-charges of All India Congress Committee
Gulam Nabi Azad, Ambika Soni, Moti Lal Vohra, Luzenio Falerio, Mallikarjun Khadge dropped from the list of general secretaries pic.twitter.com/DvD9gjcPYL
— ANI (@ANI) September 11, 2020