IndiaNewsUpdate : देशातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यास केंद्राची सशर्त परवानगी , राज्याच्या भूमिकेकडे लक्ष…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून बंद असलेल्या देशातील शाळा २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. मात्र स्वेच्छेने आणि पालकांच्या संमतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थी शाळेत येतील असे या आदेशात नमूद करण्यात आले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडून याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार येत्या २१ सप्टेंबरपासून इयत्ता ९ ते १२ वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली आहे मात्र गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे. दरम्यान शाळेत येणाऱ्या एखाद्या शिक्षकांमध्ये , कर्मचाऱ्यांमध्ये किंवा विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर जवळच्या आरोग्य केंद्रात त्याला उपचारासाठी पाठवण्यात यावे आणि तातडीने आयसोलेशन रूममध्ये रवानगी करावी असे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान महाराष्ट्रासह दिल्ली आणि काही राज्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत कुठल्याही शाळा , किंवा महाविद्यालये उघडणार नसल्याचे आधीच घोषित केले असून २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी ५० टक्के क्षमतेने शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकतील असे आधीच म्हटले आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन राज्य सरकार करणार कि नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शासनाच्या गाईडलाईन्स नुसार शाळा सुरू करताना शाळेत येणाऱ्या शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला कोरोनाचे कुठलेही लक्षण असता कामा नये. मास्क, सॅनिटायजरचा वापर शाळेत वेळोवेळी खबरदारी म्हणून करणे आवश्यक आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे . वर्ग खोलीत सुद्धा त्यानुसार आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे. बाहेरील व्यक्तीस शाळेत येण्यास मनाई असणार आहे. लायब्ररी, मेस, कँटिनमध्ये सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. ट्रान्सपोर्टेशनमध्ये बस, वाहन पूर्णपणे सॅनिटाइज केले जावे, अशा सूचना केंद्राने केल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करण्यास किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मात्र परवानगी नाही.
दरम्यान शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण परिसर, वर्ग, प्रयोगशाळा, टीचिंग परिसर एक टक्के सोडियम हायपोक्लोराइटने सॅनिटाईज केला जावा लागणार आहे. विशेषत: ज्या पृष्ठभागावर वारंवार स्पर्श केला जातो ते भाग आणि स्वच्छ केल्या जाव्यात, शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतर 6 फूटांपेक्षा जास्त असावे. ज्या शाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या त्या पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्वच्छ आणि डीप सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. या कालावधीत केवळ 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना शाळेत बोलावले जाईल. शाळेत बायोमेट्रिक हजेरीऐवजी शाळा प्रशासनाकडून संपर्क कमी हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल.