BreakingNewsInMumbai : अखेर रिया चक्रवर्तीवर एनसीबीकडून अटकेची कारवाई

Actor Rhea Chakraborty arrested by Narcotics Control Bureau (NCB) in Mumbai: KPS Malhotra, Deputy Director, Narcotics Control Bureau pic.twitter.com/aB4zKOoawL
— ANI (@ANI) September 8, 2020
बहुचर्चित सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अखेर अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केलं आहे. रविवारी सुरू असलेल्या चौकशीनुसार एनसीबीकडून रियाच्या अटकेची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान रविवार आणि सोमवारी चौकशी अपूर्ण राहिल्यामुळे रियाला आज मंगळवारी पुन्हा बोलावण्यात आले होते अखेर प्राथमिक चौकशीत अनेक पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याने मंगळवारी संध्याकाळी एनसीबीने रियाला अटक केली असल्याचे वृत्त आहे.
ताज्या माहितीनुसार एनसीबीची टीम सध्या रियाच्या अटकेचा मेमो तयार करत असून त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. सध्या ती एनसीबी पथकाच्या ताब्यात आहे. असं सांगितलं जात आहे की, आता कागपत्रांची जुळवाजुळ सुरू आहे . सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर रिया चक्रवर्ती यांना अटक केली जाईल. आतापर्यंत रियाने ती कोणतंही व्यसन करत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र सोमवारच्या चौकशीत तिने सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचं मान्य केलं. आज मंगळवारी मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते पण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रियानं सीबीआय चौकशीत सांगितलं होतं. पण आता एनसीबीच्या चौकशीत मात्र तिनं ड्रग्ज घेतल्याचं कबूल केलं आहे. ड्रग्ज घेतल्याचं मान्य केल्यानंतर सुशांतनंच तिला जबरदस्तीनं ड्रग्ज घेण्यासाठी भाग पाडलं होतं, असं रियानं म्हटलं, असल्याची माहिती आहे. दरम्यान सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुसान वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांतने डॉक्टरांचा सल्ला जरी घेतला असला तरी ही गोष्ट फार गोपनीय असते. याचा खुलासा केला जात नाही. डॉक्टरांनी वैद्यकीय तत्त्वांचं उल्लंघन केलं, असा आरोप कुटुंबाने केला आहे.
Rhea Chakraborty yet to be formally arrested. Paperwork and other formalities are being completed: KPS Malhotra, Deputy Director, Narcotics Control Bureau #Mumbai https://t.co/LEyff4h72W
— ANI (@ANI) September 8, 2020