MumbaiNewsUpdate : चर्चेतली बातमी : शिवसेनेच्या नाकावर टिचून , कंगनाला अमित शहांनी दिली 24×7 – Y दर्जाची सुरक्षा

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बहुचर्चित अभिनेत्री कंगना राणावतला शिवसेनेने तू मुंबईत ये , तुला शिवसेना स्टाईल दणका देऊ असा इशारा दिल्यानंतर आणि कंगनाने “मी ९ तारखेला मुंबईत येत आहे . ज्यांना काय उपटायचे ते उपटा.. ” असा इशारा दिल्यानंतर मोठा तणाव निर्माण झालेला असताना आता शिवसेना आणि कंगनाच्या वादात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उडी घेतली आहे. कंगनाला आता Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कंगना विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाला ९ तारखेला मुंबई पाय ठेवूनच दाखवं अशी धमकीच दिली आहे. एवढंच नाहीतर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाचे थोबाड फोडणार असं जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता या वादात केंद्रीय मंत्री अमित शहांनी हस्तक्षेप केला आहे.
दरम्यान अमित शहांनी कंगनाला आता Y दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतलेली भूमिका पाहता केंद्र सरकारने थेट भूमिका घेतली आहे. Y दर्जाची सुरक्षा पुरवली आहे यामध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24×7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते. आपल्याला Y दर्जाची सुरक्षा मिळाल्यामुळे कंगना राणावतने अमित शहा यांचे आभार मानले आहे. ‘मला दिलेली ही सुरक्षा हे प्रमाण आहे की, देशात कोणत्याही देशभक्ताची आवाज कुणीही थांबवू शकत नाही.’ असं सांगत कंगनाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ‘मला वाटलं अमित शहा हे मला काही दिवस मुंबईत न जाण्याचा सल्ला देतील. पण, त्यांनी भारताच्या एका मुलीने दिलेल्या वचनाचा मान राखला आहे. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचा आदर राखला आहे’ असं म्हणत कंगनाने अमित शहा यांचे आभार मानले आहे.