IndiaNewsUpdate : आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉन गैरव्यवहार प्रकरणी दीपक कोचर यांना अटक

Enforcement Directorate (ED) arrests Deepak Kochar, husband of former ICICI Bank MD & CEO Chanda Kochar in connection with ICICI Bank-Videocon case: Enforcement Directorate (ED) officials pic.twitter.com/b86l6Gs2Eh
— ANI (@ANI) September 7, 2020
ईडी ने आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉन गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी संचालक आणि आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जात झालेली अनियमितता आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी चंदा कोचर, त्यांची पती दीपक कोचर आणि अन्य लोकांविरुद्ध चौकशी सुरू आहे. दीपक कोच्चर हे व्हिडीओकॉनची उपकंपनी असलेल्या नू पॉवर या कंपनीचचे संचालक होते. मुळात नू पॉवर ही कंपनी केवळ कागदोपत्री होती.
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर यांनी पदाचा गैरवापर करीत बँकेद्वारे नू पॉवर कंपनीला तब्बल १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप आहे. ते कर्ज पुढे बुडित खात्यात गेले. पण कर्ज बुडित खात्यात जाण्याचे नेमके कारण व त्या कर्जातील पैशांचा नेमका उपयोग कसा झाला, हे दीपक कोच्चर त्यावेळी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) सांगू शकले नव्हते. या प्रकरणी ईडीने २०१७ ते २०१८ डिसेंबरदरम्यान चौकशी केली होती. यामुळेच चंदा कोचर यांनाही बँकेच्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आता सुमारे दोन वर्षांनंतर या प्रकरणाची फाईल ईडीने पुन्हा उघडल्याचे दिसून येत आहे. या आधी ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठी कारवाई केली होती. ईडीने चंदार कोचर यांचा मुंबीतील प्लॅट आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची कंपनीची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीचे एकूण मुल्य ७८ कोटी रुपये इतके होते. या प्रकरणी ऑक्टोबर २०१८ मध्ये चंदा कोचर यांनी वेळे आधी निवृत्ती घेतली होती.