MaharashtraCoronaUpdate : राज्याची स्थिती चिंताजनकच , नव्या रुग्णांचा आजही वेगळा उच्चांक , 23 हजार 350 नवे रुग्ण , 328 ज्यांचा मुत्यू

गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे तब्बल २३ हजार ३५० नवे रुग्ण आढळले असून आज कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. या शिवाय दिवसभरात कोरोनाने आणखी ३२८ जणांचा बळी घेतला असल्याने राज्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक झली आहे. कारण महाराष्ट्रात करोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे .राज्यात शनिवारी २० हजारावर नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज तो आकडाही मागे पडला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून २३ हजार ३५० रुग्णांचा अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४६ लाख ४७ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९ लाख ७ हजार २१२ जणांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण एकूण चाचण्यांच्या १९.५२ टक्के इतके आहे. सध्या राज्यात प्रत्यक्ष २ लाख ३५ हजार ८५७ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक ६२ हजार ३८३ रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यातील स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. पुण्यातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्याही २ लाखांच्या जवळ पोहचली आहे. आजच्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत १ लाख ९९ हजार ३०३ जणांना करोनाची लागण झाली आहे. पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात सध्या करोनाचे २४ हजार ९४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर बराच काळ करोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या मुंबई पालिका हद्दीत तुलनेने कमी म्हणजे २३ हजार ९३९ इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. मुंबईत गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ५०० पर्यंत खाली आली असताना गेल्या काही दिवसांत हा आकडा दोन हजारच्या जवळ जाऊन पोहचल्याने पालिका आरोग्य यंत्रणेला अधिक दक्ष व्हावं लागणार आहे.
आणखी ३२८ जणांचा मृत्यू
राज्यात करोना मृत्यूदर सध्या २.९३ टक्के इतका आहे. अनेक प्रयत्न करूनही मृत्यूदर कमी होऊ शकलेला नाही. राज्यात आणखी ३२८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे असून करोनाबळींचा एकूण आकडा २६ हजार ६०४ इतका झाला आहे. ३२८ मृतांपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ४३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आकडेवारी अद्ययावत करत असताना आज या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे.