MaharashtraNewsUpdate : दाऊदच्या नावाने शिवसेनेचे श्रद्धास्थान ” मातोश्री ” उडवून देण्याची धमकी

दाऊदच्या नावाने शिवसेनेचे श्रद्धास्थान ” मातोश्री ” उडवून देण्याची धमकी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे . टीव्ही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुबईहून मातोश्री वर तीन ते चार फोन आल्याची माहिती आहे. यावर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊदशी संबंधित असून त्याने मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त पसरताच सर्वत्र खळबळ उडाली असून शिवसैनिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत . या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईचे आयुक्त परमवीरसिंग आणि सहाय्यक आयुक्त कायदा बाबी सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत.