चर्चेतली बातमी : कंगनाला पोलिसांनी संरक्षण देण्याची राजस्थानच्या गृहमंत्र्यांची मागणी तर संजय राऊत म्हणाले , कंगनाला ९ तारखेला येऊ द्या…

बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणावतने एका ट्वीटमध्ये मुंबईची तुलना पीओकेशी केल्यानंतर राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. कंगनाची वादग्रस्त ट्विटच्या निषेधार्थ शिवसेनेचे कार्यकर्ते अभिनेत्री विरोधात जोरदार प्रदर्शन करीत आहे. कंगनाने दावा केला आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिला मुंबईला परतण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी कंगनाला सुरक्षा पुरवयाला हवी. तिला स्वतंत्रपणे सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात खुलासा करण्याची परवानगी द्यावी. जेव्हा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, कंगना रणौतच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. यानंतर विज यांनी मागणी केली आहे. सरनाईकांनी सांगितल्यानुसार संजय राऊत यांनी सल्ला दिला आहे की , जर कंगना 9 सप्टेंबर रोजी मुंबईत आली तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता तिचा शिवसेना पद्धतीने समाचार घेतील. शिवसेना आमदारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
दरम्यान कंगनाला उत्तर देत संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रात लिहिले आहे की, आम्ही त्यांना निवेदन करतो की मुंबईत येऊ नये. यातून दुसरं काही नाही मात्र मुंबई पोलिसांचा अपमान होईल. गृहमंत्रालयाला यावर कारवाई करायला हवी. कंगना राणावत पीएम नरेंद्र मोदी आणि भाजपची समर्थक आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ती सातत्याने महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि बॉलिवूडवर हल्लाबोल करीत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला ९ तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.