IndiaNewsUpdate : मोठी बातमी : नीट आणि जेईई (मेन) परीक्षा प्रकरण : सहा राज्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Breaking: SC Dismisses Review petition by cabinet ministers of six states challenging August 17 Order rejecting postponement of NEET-UG and JEE (Mains) examinations.#NEET #NEET2020 #JEE #NEETJEE
— Live Law (@LiveLawIndia) September 4, 2020
आपल्या भूमिकेवर कायम राहत सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई (मेन) परीक्षा प्रकरणात दाखल करण्यात आलेली सहा राज्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान १७ ऑगस्टला न्यायालयाने हि परीक्षा घेण्यासाठी केंद्र सरकारला परवानगी दिली होती . या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी हि याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयाच सुनावणी पार पडली त्यात सर्वोच्च न्यायालयानं सहा राज्यांच्या मंत्र्यांनी केलेली हि पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.
परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचं सहा राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एनटीएकडून या दोन्ही परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. जेईई मुख्य परीक्षा ही १ ते ६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर नीट परीक्षांचं आयोजन १३ सप्टेंबर रोजी करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालचे मंत्री मलय घटक, झारखंडचे मंत्री रामेश्वर ओरांव, राजस्थानचे मंत्री रघु शर्मा, छत्तीसगढचे मंत्री अमरजीत भगत, पंजाबचे मंत्री केबीएस सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी ही याचिका दाखल केली होती.