MumbaiNewsUpdate : SSR Death Case : असा चालू आहे सीबीआयचा तपास, अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सीबीआयने सुशांतशी संबंधित सलेल्या अनेक लोकांची चौकशी केली आणि अद्याप चालूच आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून बरीच माहिती उघड झाली आहे परंतु त्याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यात मात्र अद्यापही यश आलेलं नाही. दरम्यान सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. “इंडिया टुडे”शी बोलताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. परंतु , आताही या प्रकरणाची चौकशी सुरूच असल्याने कुठल्याही निष्कर्षांप्रत येत येणार नाही असेही हे अधिकार म्हणाले.
या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले कि , सध्या आत्महत्येच्या अँगलवरही आपण लक्ष देत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच सुशांतची हत्या झाली नाही तर त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का ? याचाही तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत सीबीआयनं क्राईम सीन रि-क्रिएट केला. तसंच मुंबई पोलिसांद्वारे जमवण्यात आलेल्या पुराव्यांचा तपास आणि या प्रकरणाशी निगडीत सर्व संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट, संशयितांचे जबाब आणि क्राईम सीन रिक्रिएशनकडे पाहता यात हत्येकडे बोट दाखवणारे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं टीमचं म्हणणं आहे. या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एम्सच्या फॉरेन्सिक टीमचा अहवाल आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा आणि ऑटोप्सी रिपोर्टही आहे. दरम्यान, मंगळवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या आई-वडिलांचीही चौकशी करण्यात आली. तसंच ड्रग्सचा अँगल आल्यामुळे ईडीनं गौरव आर्यालाही चौकशीसाठी बोलावलं होतं.