MumbaiCoronaUpdate : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रियाची चौकशी करणाऱ्या उपायुक्ताला कोरोनाची बाधा

बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी अंतर्गत सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे वांद्रे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना करोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. त्रिमुखे यांच्यासह त्यांच्या संपुर्ण कुटुंबालाही करोनाने गाठले आहे. सीबीआयचे पथक मुंबईत आल्यानंतर त्रिमुखे आणि परमजित सिंह दहिया यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. तसंच, सुशांत प्रकरणात स्पष्टीकरणही मागण्यात आलं होतं. दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर रिया आणि त्रिमुखे यांच्यातील कॉल डिटेल समोर आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने अभिषेक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. चार फोन कॉल्स आणि एक एसएमएसद्वारे या दोघांमध्ये संपर्क झाला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सीबीआयकडे तपास गेल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिस दलातील त्रिमुखे यांच्यांशी संपर्क साधला होता. त्यामुळे त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाचीही करोना चाचणी होणार आहे.