MaharashtraCoronaUpdate : राज्यभरात आणखी १६१ पोलीस करोनाबाधित , एका पोलिसांचा मृत्यू

161 more police personnel found #COVID19 positive & one died in the last 24 hours in Maharashtra. Total number of Corona positive police personnel in the state reaches to 14,953 including 2,800 active cases, 11,999 recoveries & 154 deaths till date: Maharashtra Police pic.twitter.com/YtED3NpUJt
— ANI (@ANI) August 30, 2020
गेल्या २४ तासांमध्ये राज्यभरात आणखी १६१ पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ९५३ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ८०० जण, करोनामुक्त झालेले ११ हजार ९९९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १५४ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे. राज्यातील १४ हजार ९५३ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५९६ अधिकारी व १३ हजार ३५७ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ८०० पोलिसांमध्ये ३६४ अधिकारी व २ हजार ४३६ कर्मचारी आहेत. करोनामुक्त झालेल्या ११ हजार ९९९ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार २१७ व १० हजार ७८२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १५४ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.