MaharashtraPolitics : मंदिरं खुली करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना आणि भाजपाला आरोग्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर !!

दारूची दुकाने, मॉल सुरू केले आहेत, मग राज्य सरकार मंदिरे का खुले करत नाहीत ? काही राज्यांत धार्मिक स्थळे खुली केली आहेत. तिथे करोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसत नाही. मग त्याची भीती घालून मंदिरे बंद ठेवणे कितपत योग्य आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असा प्रश्न विचारणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर देताना , राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे अचानक मोठ्या प्रमाणात खुली केली व करोना बाधित रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढून बेडस् उपलब्ध झाले नाहीत तर मग आपण रुग्णांना ठेवायचे कुठे?, असा प्रतिप्रश्न विचारला आहे .
दरम्यान हा प्रश्न उपस्थित करताना राजेश टोपे यांनी मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करणाऱ्या भाजपलाही फटकारले. मंदिरं खुली केली जातील पण योग्य वेळेस त्याबाबत निर्णय होईल, मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकालाच आवडणारा विषय आहे. हा श्रद्धेचा भाग आहे. या ठिकाणी राजकारणाचा अजिबात संबंध असण्याचे कारण नाही. या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांचीच इच्छा असते परंतु आज प्राप्त परिस्थितीत करोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या बघता अचानकपणे सगळं खुलं केलं आणि रुग्णालयात बेडस् उपलब्ध झाले नाहीत तर मग रुग्णांना काय बाहेर ठेवायचे का?, असा सवाल टोपेंनी उपस्थित केला.
फडणवीसांनी नागपुरातही लक्ष घालावे
टोपे पुढे म्हणाले कि , मंदिरे बंदच राहावीत, अशी कुणाचीही इच्छा नाही. मंदिरे आणि सर्वच धार्मिक स्थळे सुरू झाली पाहिजेत परंतु ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या या इच्छेचा आदर केला गेला पाहिजे, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बारामतीत दौरा करतात. त्याला कुणाचीच हरकत नाही. त्यांनी जरूर सगळी माहिती घ्यावी परंतु करोना संसर्गाच्या साथीच्या संदर्भात त्यांनी राजकारण करू नये. फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार आहे मात्र नागपूर मध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नागपूरमध्येही थोडे लक्ष घालावे, असा टोला टोपे यांनी यावेळी लगावला.