MaharashtraNewsUpdate : फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास न्यायालयाची परवानगी , पण ….

Bombay High Court allows Taziya procession on Muharram in Mumbai with not more than 5 people. No other procession allowed anywhere in the state of Maharashtra. pic.twitter.com/Ii9htANux1
— ANI (@ANI) August 28, 2020
मुंबई उच्च न्यायालयाने फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे देशभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून करोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन बंधनं आणण्यात आली आहेत. मुस्लीम समुदायात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात येते. मात्र, करोनामुळे सोशल डिस्टसिंगसह इतर बंधन आणण्यात आल्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही भागात मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.
दरम्यान मिरवणूक काढण्याच्या मागणीसंदर्भात लखनौतील मुस्लीम समुदायातील काही व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला होता. न्यायालय म्हणाले,”जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे. एक न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणाऱ्या धोक्याचा विचार केला असता,” असं न्यायालयानं आदेशात म्हटलं होतं.