SushantSingRajputDeathCase : सुशांतला ‘ड्रग्स ” चे व्यसन लावण्याच्या कटावरून रियासह तिच्या साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा

Narcotics Control Bureau registers a case in #SushantSinghRajput's death. pic.twitter.com/PhBj2mZRb6
— ANI (@ANI) August 26, 2020
बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून सर्व बाजू तपासून पहिल्या जात आहेत. दरम्यान आता सुशांतसिंह प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने , ‘ड्रग्सचा कट’ रचल्याचा आरोपावरून नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या 20, 22, 27, 28, 29 कलमान्वये अभिनेत्री रियासह तिच्या साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. ईडीच्या एफआयआरमध्ये ज्यांची ज्यांची नावं होती त्यांच्याविरूद्ध एनसीबीने हा गुन्हा दाखल केला आहे. यात रियाच्या भावासह इतरांचाही समावेश आहे.
या प्रकरणी आता रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, जया साहा, श्रुती मोदी आणि पुण्याचा गौरव आर्य आणि इतर ड्रग्स डिर्लसचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. दिल्लीतील एनसीबीचे ऑपरेशन्स युनिट हे मुबंतील मुंबईतील एनसीबीसोबत मिळून सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगलची चौकशी करणार आहे. रियाचा भाऊ शौविक आणि इतर काही जणांचे ड्रग्स तस्करांशी संबंध आहेत. यामुळे सुशांतला एखाद्या सुनियोजित षडयंत्रांतर्गत ड्रग्सच्या सापळ्यात अडकवण्यात आलंय का? याचा तपास एनसीबी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. रिया चक्रवर्ती आणि इतर संबंधित जणांचे सातत्याने होत असलेले ड्रग्स चॅट्स उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान “चहा, कॉफी किंवा पाण्यात ४ थेंब टाकून त्याला दे. त्याचा परिणाम बघण्यासाठी ३० मिनिटं थांब, असा मेसेज जया साहाने रियाला केला होता. असे अनेक पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत.