IndiaNewsUpdate : तेलंगणातील जलविद्युत प्रकल्पाला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा होरपळून अंत

#UPDATE Nine persons trapped inside the Left Bank Power House in Srisailam, in Telangana side, have lost their lives in the fire accident: Telangana State Power Generation Corporation Limited https://t.co/9kMA1D9jBK
— ANI (@ANI) August 21, 2020
तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात गुरूवारी मध्यरात्री अचानक भीषण आग आलगून सापडल्यानं ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला . हे वृत्त समजताच एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांचे प्रयत्न अपयशी ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल आपल्या शोक संवेदना प्रकार केल्या आहेत.
Fire at the Srisailam hydroelectric plant is deeply unfortunate. My thoughts are with the bereaved families. I hope those injured recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2020
या विषयीची अधिक माहिती अशी कि , तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे १९ कर्मचारी होते. मात्र, ९ कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तिघांची ओळख पटली आहे. तिघेही सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते. सुंदर नाईक, मोहन कुमार आणि फातिमा अशी ओळख पटलेल्या तीन मृतांची नावं आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जलविद्युत प्रकल्पामध्ये झालेल्या या अग्नितांडवाच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान राव यांनी या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले असून सीआयडीचे अतिरिक्त संचालक गोविंद सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राव यांनी घटनेत मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल शोक व्यक्त केला. कृष्णा नदीवर निर्माण करण्यात आलेल्या हे पॉवर स्टेशन हैदराबादपासून सुमारे २०० किमी दूर आहे. हे पॉवर स्टेशन तेलंगण राज्य पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन (जेनको) तर्फे संचलित केले जाते. या संयंत्रात एकूण ६ भाग असून त्यांची एकूण क्षमता ९०० मेगावॅट वीज उत्पादन करण्याची आहे. इथे चांगला पाऊस झाल्यानंतर या संयंत्रात वीज निर्मितीचे काम जोरात सुरू होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.