IndiaNewsUpdate : मोठी बातमी : सरकार आणि राजकीय पक्षांना हव्यात निवडणूका, त्यावर निवडणूक आयोगाने जारी केल्या या मार्गदर्शक सूचना….

पाच लोकांना सोबत करता येईल दारोदार प्रचार , सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी
Election Commission of India issues guidelines for the conduct of general elections/by-elections during COVID-19; candidates can file nomination online, people to wear face masks during election-related activities. pic.twitter.com/j30hnGJkD1
— ANI (@ANI) August 21, 2020
देशात कोरोना संसर्गाची साथ सुरु झाल्यानंतर सर्व निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती . दरम्यान निवडणूक आयोगाने आता कोरून काळात निवडणुकांच्या बाबत नियमावली जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाइन्स नुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक काळातील कामादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. साहजिकच निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात डोर टू डोर कँपेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
भारतीय निवडणूक आयोगाने कोविड -19 कालावधीत सार्वत्रिक/पोटनिवडणुका घेण्याच्या व्यापक मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली आहे. भारतात कोरोना साथीचा रोग सुरू झाल्यानंतर गृह मंत्रालय (एमएचए) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वांच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये काही गोष्टींचा समावेश आहे. उमेदवारीसाठी येणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि नामनिर्देशनाच्या वेळी वाहनांची संख्या आयोगाने निश्चित केली आहे. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी पर्यायी सुविधा आणि आरओ संबंधी प्रांताची छापील कागदपत्रे घेतल्यानंतर ऑनलाईन प्रतिज्ञापत्रे सबमिट करण्याची सुविधा तयार केली आहे. प्रथमच उमेदवारांना निवडणुका लढविण्याकरिता सुरक्षा रक्कम जमा करण्याचा ॲानलाईन पर्याय असेल. कंटेनर मार्गदर्शक तत्त्वे डोळ्यासमोर ठेवून, आयोगाने घरोघरी प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांची संख्या पाचवर मर्यादित केली आहे.
अशी असेल यंत्रणा
निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या विनंतीवरून 11 ऑगस्ट, 2020 पर्यंत ही मुदत वाढवून दिली होती. विविध राजकीय पक्ष आणि राज्य , केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून निवडणूक प्रचार आणि जाहीर सभेबाबत प्राप्त झालेल्या मते, सूचनांवर आयोगाने विचार केला आहे. गृहविभाग तसेच राज्याने जारी केलेल्या सूचनांच्या अधीन योग्य सूचनांसह सार्वजनिक सभा आणि रोड शो अनुमत आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान फेसबूक, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ग्लोव्हज, फेस शिल्ड आणि पीपीई किट वापरल्या जातील. मतदार नोंदणीवर सही करण्यासाठी आणि मतदानासाठी ईव्हीएमचे बटण दाबण्यासाठी सर्व मतदारांना हँड ग्लोव्हज प्रदान केले जातील. संबंधित राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सर्वसमावेशक राज्य/जिल्हा व एसी निवडणूक योजना तयार करतील. या योजना त्यांच्या संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील कोविड -19 साठी नोडल ऑफिसरच्या सल्लामसलत करून तयार केल्या जातील. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपत आहे. अशातचं ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.