UttarPradeshNewsUpdate : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमेवरच का रोखले ? “सत्यमेव जयतेची ” हत्या का झाली ?

बसगाव जिल्हा आज़मगढ़ उत्तरप्रदेश में मेरे भाई दलित प्रधान सत्यमेव दस्ते की हत्या हुई। पीड़ित परिवार को मिलने से मुझे रोका जा रहा है। pic.twitter.com/SOTzgv4Z24
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) August 20, 2020
राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील सत्यमेव जायते या ४२ वर्षीय अनुसूचित जातीच्या सरपंचाची हत्या झाली असून त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी नितीन राऊत चालले होते. पण नितीन राऊत यांना पोलिसांनी आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काँग्रेसने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.
महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री व दलित कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinRaut_INC को आजमगढ़ बॉर्डर पर डिटेन कर लिया गया।
यूपी सरकार दलित प्रधान की हत्या तो नहीं रोक पाई लेकिन अब श्री सत्यमेव जयते के घर पहुंचने वाले संवेदना संदेशों को रोकने में लगी है। pic.twitter.com/MwrQ3BPWi4
— UP Congress (@INCUttarPradesh) August 20, 2020
याबाबत काँग्रेसने ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकलं नाही मात्र त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी निघालेल्या नेत्याला उत्तर प्रदेश सरकार रोखत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली होती. हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे राष्ट्रे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत दौऱ्यावर गेले असता त्यांना रोखण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली.
आज़मगढ़ से पहले गौरा-बादशाहपुर में दलित कांग्रेस अध्यक्ष एवं महाराष्ट्र सरकार मंत्री @NitinRaut_INC जी, भगवती चौधरी और कांग्रेस के कार्यकर्ताओं के साथ हमे रोक लिया गया है ,
डॉ नितिन राउत जी इस तानाशाही के खिलाफ यहीं धरने पे बैठ गए हैं। pic.twitter.com/mnPMu6s1fY— Pradeep Narwal (@Narwal_inc) August 20, 2020
दरम्यान पोलिसांनी नितीन राऊत यांना रोखल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथेच रस्त्यावर बसून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. ४२ वर्षीय सत्यमेव जयते यांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशात सध्या तणाव आहे. त्यात नितीन राऊत यांच्यावरील पोलीस कारवाईमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील सत्यमेव जायते या ४२ वर्षीय दलित सरपंचाची हत्या झाली असून यामुळे या गावात तणावाची परिस्थिती आहे. हत्या करणारे सर्व आरोपी फरार असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात रासुका आणि गैंगस्टर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींची माहिती देणारांना २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे . दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले आहे.
सत्यमेव जयतेच्या नातेवाईकांनी सांगितले कि , गावच्या सरपंचपदी एका दलित व्यक्तीची नियुक्ती झाल्यापासून गावातील तथाकथित उच्चवर्णीयांना हे सहन होत नव्हते. त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास सत्यमेव जयते तयार नव्हता त्यामुळे हि मंडळी त्याच्या विरोधात होती . शुक्रवारी संध्याकाळी मोटार सायकलवर आलेल्या आरोपींनी सत्यमेव जयतेला घराबाहेर बोलावून त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले खरे पण आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही. या दरम्यान पोलीस आणि लोकांच्या गर्दीत ८ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाड्यांना आणि बोंगरिया येथी पोलीस चौकीला आग लावली . या पार्श्वभूमीवर या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
या बाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , गावातील ठाकूर आणि ब्राह्मणांना सरपंच सत्यमेव जयते याचे स्वाभिमानी वागणे मंजूर नव्हते . गावातील कथित सवर्ण मंडळींच्या मर्जीने न चालणे त्याच्या जीवावर बेतले. मयत सरपंचाच्या कुटुंबीयांनी सांगितले कि , आम्ही परिश्रमातून १५ एकर जमीन घेतली होती ते सुद्धा त्यांना पसंत नव्हते. या प्रकरणात पोलिसांनी विवेकसिंह भोलू, सूर्यांश कुमार दुबे, बृजेंद्र सिंह गप्पू, वसीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजमगडचे डीआयजी सुभाष चंद्र म्हणाले कि , या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून ८ वर्षाच्या मुलाचा पोलिसांच्या गाडीखाली येऊन झालेल्या मृत्यूचीही चौकशी पोलीस करीत आहेत. दिवंगत सरपंच सत्यमेव जयते याच्या परिवारात ३० जणांचे संयुक्त कुटुंब आहे . त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले कि , आमचे कुटुंब पूर्वीपासूनच प्रगतिशील आहे . त्यातूनच त्यांचे नाव सत्यमेव जयते असे ठेवण्यात आले आले होते. तर त्यांच्या पुतण्याचे नाव अमेरिकेतील गुलामीची प्रथा संपविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती लिंकन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. सत्यमेव जयते यांना तीन मुले असून त्यांचा मोठा मुलगा १२ वर्षाचा आहे.