MuumbaiNewsUpdate : तरुण चित्रकार राम कामत यांची आत्महत्या

प्रसिद्ध चित्रकार राम कामत वय ४१ यांनी त्यांच्या राहत्या घरी माटुंगा येथे बुधवारी संध्याकाळी आत्महत्या केली, त्यांचा मृतदेह बाथ टबमध्ये सापडला असून त्यांनी सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. राम कामत बुधवारी संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते बाथरूममधून बाहेर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आईने दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा आतून बंद केला नव्हता. दार उघडून त्यांची आई जेव्हा आत गेली, तेव्हा राम कामत बेशुद्धा अवस्थेत बाथ टबमध्ये पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
राम कामत हे एक तरुण चित्रकार होते. मुंबईतील माटुंगा येथे ते आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होते. ते अविवाहित होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राम कामत हे नैराशामध्ये होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरु होते. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपस चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या सुसाईड नोटमध्ये राम कामत यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्यांनी जे चित्रं काढली आहेत ती त्यांच्या मित्रांना देण्यात यावीत, त्यांची आठवण म्हणून’ दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राम कामत यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. राम कामत यांचे मित्र कोण आणि मित्रांपैकी कोणाचा फोन आला होता का? याची चौकशी पोलीस करणार असून त्यांच्या मित्रांची माहिती पोलीस गोळा करत आहेत. राम कामत यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही पोलीस माहिती घेणार आहेत.