SushantSingRajputDeathCase : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयला राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य : अनिल देशमुख

We welcome judgement of Supreme Court and we will provide whatever cooperation is needed by the CBI. It is a matter of pride for Mumbai Police that Supreme Court observed there is no fault found in their investigation: Maharashtra Home Minister Anil Deshmukh#SushantSinghRajput pic.twitter.com/sDo8PW8dGJ
— ANI (@ANI) August 19, 2020
बॉलिवूड स्टार सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करून सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे असं त्यांनी सांगितलं.
सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून अनिल देशमुख पुढे म्हणाले कि, बिहारमध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या लक्षात ठेवून काही नेते राजकारण करत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचं सांगितलं असून ते जास्त महत्त्वाचं आहे,” दरम्यान राज्य सरकार न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार का ? या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करून सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचेही आदेशात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.