MaharashtraNewsUpdate : निर्माता दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी खोटी , अफवा पसरवू नका….

Nishikant kamat is on ventilator support. He is still alive & fighting. Let’s pray for him.
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरत होती. मात्र अभिनेता रितेश देशमुखने निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून, तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, असे ट्वीट केले आहे. निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास असून. त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, निशिकांत कामत यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे, सुभाष देसाई यांनीही श्रध्दांजली वाहत ट्वीट केले. मात्र रितेशनं ट्वीट केल्यानंतर त्यांनीही हे ट्वीट डिलीट केले. दरम्यान अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण व्यक्त केली होती.
डोबिंवली फास्टपासून दिग्दर्शक म्हणून निशिकांत कामत याने मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत पदार्पण केले या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. त्यानंतर २००८ मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटात त्यांनीही भूमिका केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची निर्मिती आहे. निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. त्यांच्या गाजलेल्या सिनेमामध्ये अजय देवगणचा ‘दृश्यम’, इरफान खानचा ‘मदारी’, जॉन अब्राहमचा ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं.