MaharashtraCrimeUpdate : बलात्काराचा गुन्हा मागे न घेणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीस पेटवून दिले….

देशभरात ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने चक्क पीडित महिलेच्या १० वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावात घडल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले कि , आदिवासी समाजातील २६ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने थेट पीडितेच्या १० वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सुपा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री सुपा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी अजित पाटील हे करीत आहेत. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील वाघुंडे या गावातील ही गंभीर घटना आहे. वाघुंडे गावातील आदिवासी समाजातील २६ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात राजाराम तरटे याच्या आरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेवर दबाव आणला. तरी देखील अत्याचारित महिलेने गुन्हा मागे न घेतल्याने संतप्त आरोपीने थेट महिलेच्या घरी जाऊन तिच्या १० वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत १० वर्षीय मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.