maharashtraCrimeUpdate : मुलीसोबत लग्न करण्यास नकार देणाऱ्या पित्याचा तब्बल ८ वर्षानंतर खून

तब्ब्ल आठ वर्षापूर्वी मुलीच्या लग्नाला नकार देणाऱ्या वृद्ध पित्याविरुद्ध रागाची आणि बदल्याची भावना ठेवून तरूणा मुलीच्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.१४ ऑगस्टच्या रात्री आरोपी अभिजीत पाटील हा मयत व्यक्तीच्या घरी गेला तेंव्हा मुलीचे वडील घरात एकटेच असल्याचं पाहत आरोपीने त्यांच्या डोक्यात दगडी जाते घालून खून केला. सुभाष रामचंद्र काळोखे वय वर्षे ७३ असे मृत व्यक्तिचे नाव असून या प्रकरणी देवरूख पोलिसांनी अभिजीत पाटील या आरोपीला अटक केली आहे. आरोपी अभिजीत हा रत्नागिरी जवळच्या नाचणे गावात राहत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१२ साली अरोपी अभिजीत पाटील यानं सुभाष काळोखे यांच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छ व्यक्त केली होती. पण वडिलांनी मात्र या गोष्टीला नकार दिला होता. त्यानंतर देखील अभिजीत पाटील हा सतत लग्नासाठी तगादा लावत होता. अखेर एक दिवशी सुभाष यांनी अभिजीतच्या कानाखाली लागावली होती. तोच राग मनात ठेवत अभिजीत पाटीलने तब्बल ८ वर्षानंतर मुलीच्या बापाचा खून केला. १४ ऑगस्टच्या रात्री अभिजीत कोंडगाव येथे पोहोचला. त्यानंतर त्यानं सुभाष काळोखे एकटे असल्याचा फायदा घेत त्यांच्या डोक्यात दगडी जाते घालून घटनास्थळावरून पसार झाला. मध्यरात्री हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर सुभाष काळोखे यांच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली. यानुसार देवरूख पोलिसांनी वेगानं सूत्र हालवत आरोपी अभिजीत पाटीलला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. देवरूख पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.