कोरोनाबाधित पित्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्य दर्शनासाठी मुलाकडे ५१ हजारांची मागणी….

पश्चिम बंगालमधील एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुलाकडे ५१ हजारांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबात इंडिया टुडे ने वृत्त देऊन हे प्रकरण उजेडात आणले आहे. मयताच्या मुलाने याबात मयत हरी गुप्ता यांचा मुलगा सागर गुप्ताने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले कि , “रविवारी दुपारी आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला आणि त्यांनी माझ्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. सुमारे १ वाजल्याच्या दरम्यान आम्हाला फोन आला. याबद्दल आम्हाला आधीच का सांगितले नाही असे विचारले असता, आमचा फोन नंबर नसल्याचं कारण हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं . दरम्यान ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचलो त्यावेळी माझ्या वडिलांचे पार्थिव थेट स्मशानभूमित घेऊन गेल्याचे आम्हाला समजलले त्यामुळे वडिलांचं शेवटचं दर्शन व्हावं या हेतूने आम्ही शिबपूर स्मशानभूमीजवळ पोहचलो त्यावेळी पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायचं असेल तर ५१ हजार रुपये द्या अशी मागणी करण्यात आली.”
दरम्यान गुप्ता परिवाराने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर समोरच्या व्यक्तींनी तडजोड करण्याची तयारी दाखवत ३१ हजारांची मागणी केली. अखेरीस गुप्ता परिवाराने पोलिसांत तक्रार दाखल करायचं ठरवलं. पोलीस घटनास्थळावर आले सुद्धा परंतु हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचं कारण देत पोलिसांनाही माझ्या वडिलांच्या पार्थिवापाशी जाऊ दिलं नाही. पार्थिव पहायचं असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला असं ते अधिकारी म्हणत होते. गुप्ता परिवाराच्या तक्रारीवरून अधिक तपास चालू आहे.