CoronaNewsUpdate : प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाने घेरले

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रसिद्ध  शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राहत इंदौरी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. ‘अचानक लक्षण जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे’ अशी माहिती इंदौरी यांनी दिली. तसंच,’मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल’ अशी विनंतीही इंदौरी यांनी केली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!