CoronaSolapurUpdate : पंढरपुरात पोलीस नाईकचा कोरोनामुळे मृत्यू , एकुलत्या एक मुलीचे ठरले होते लग्न….

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नाईक आमिन आप्पा मुलाणी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची पंढरपूरतील ही पहिलीच घटना आहे. अमिन आप्पा मुलाणी (वय 50, रा. पोलीस लाईन, पंढरपूर) अक्ससे त्यांचे नाव आहे. आमिन मुलाणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. या दरम्यान रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे.
मुलाणी मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. परंतु काळाने अचानक मुलाणी यांच्यावर झडप घातली. कुटुंबातील ते एकमेव आधार होते. एकलुती एक लेकीचा विवाह सोहळा न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाणी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असून एकाचे असे दुःखद निधन झाले आहे तर एकावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पंढरपूर शहरातील पोलीसाचा कोरोनामुळे पहिला बळी गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कायदेशीर मदत मिळणे अपेक्षित आहे.