Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SushantSingRajputDeathCase : कुत्र्याच्या पट्ट्याने सुशांतचा गळा घोटून खून केल्याचा संशय , माजी सहाय्यकाच्या वक्तव्याने खळबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूविषयी सीबीआय चौकशी चालू असताना अनेक खुलासे होत असून आता सुशांतच्या माजी सहाय्यक अंकित आचार्य याने   ‘सुशांतने आत्महत्या केली नाही, तर फजच्या पट्ट्याने त्याचा गळा आवळण्यात आला आहे’, असं वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.  ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सुशांतने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्याच झाली आहे, असा संशय अंकितने व्यक्त केला आहे. परंतु, त्याच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता त्याच्याकडे वळल्याचे  दिसून येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Advertisements

अंकिताने पुढे म्हटले आहे कि , ”मला सुशांतचा स्वभाव चांगल्या पद्धतीने माहित होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे, यावर मी विश्वास ठेऊच शकत नाही. ही आत्महत्या नसून हत्याच आहे. जर समजा आपण हे मान्य केलं की सुशांतने आत्महत्या केली. तर कोणीही आत्महत्या केल्यावर त्याच्या गळ्यावर U शेपचा आकार येतो. पण ज्यावेळी कोणी गळा दाबायचा प्रयत्न करतं त्यावेळी गळ्यावर O शेपचा आकार दिसून येतो. सुशांतच्या गळ्यावर सुद्धा O शेप होता”, असं अंकित म्हणाला. त्याच बरोबर आत्महत्या केल्यावर डोळे आणि जीभ बाहेर येते. पण सुशांतचं तसं अजिबात झालं नव्हतं. त्यामुळे ही आत्महत्या नाही, हत्याच आहे. मी एक नक्की सांगू शकतो की त्याच्या गळ्यावर कोणत्या प्रकारच्या खूणा होत्या. या खूणा सुशांतच्या पाळीव श्वानाच्या फजच्या बेल्टच्या होत्या. माझ्याकडे सुशांतचे मृत्यूनंतरचे काही फोटो आहेत. हे फोटो पाहिल्यावर मला सतत जाणवतं की सुशांतच्या गुन्हेगाऱ्यांनी त्याचा फजच्या बेल्टने गळा आवळून खून केला आहे”.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!