Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : आजी -आजोबा आणि काकाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना ….

Advertisements
Advertisements
Spread the love

“कामातुराणां भय ना लज्जा…” असे म्हटले जाते ते खरेच आहे . अशा वासनांध लोकांना नात्याचे , वयाचे भानही राहत नाही. अशीच एक लज्जास्पद आणि आजी -आजोबाच्या आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पिंपरी -चिंचवड  येथे घडली आहे. या घटनेमध्ये आपल्या नात्यातील अल्पवयीन मुलीसमोर आजी-आजोबाने अश्लील चाळे करत तिला जबरदस्तीने बघायला लावले. तसंच त्यानंतर बघितलं नाही म्हणून पुन्हा मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पीडीत मुलीच्या काकाने ( मावशीच्या पतीने ) तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Advertisements

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2014 पासून 2020 पर्यंत वेळापूर, पंचशिल नगर व मसवड येथे घडली. फिर्यादी यांची सख्खी आजी व आजोबा यांनी फिर्यादीच्या समोरच शाररीक संबंध प्रस्थापित केले. तसंच ते पाहण्यास फिर्यादीस बळजबरी केली. याला फिर्यादीने नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ केली. तसेच पीडीत मुलीचे आजोबा यांनी पीडीत मुलीसोबत शारीरिक अत्याचार केले. दरम्यान ही बाब तक्रार देणाऱ्या पीडितेने आजीला सांगितली असता तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच  फिर्यादीच्या पतीनेही पीडीतेला गावाला नेऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे नमुद करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!