UttarPradeshNewsUpdate : सपा नेते मुलायमसिंग रुग्णालयात दाखल

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांना उपचारार्थ मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . मुलायमसिंग हे 80 वर्षांचे असून गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती अलीकडच्या काळात नाजूक झाली आहे. या आधीही त्यांना मेदांतामध्येच दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यादव यांच्या आणखी काही टेस्ट केल्या जाणार आहेत. वय जास्त असल्याने उपचाराची दिशा ठरवतांना डॉक्टर्स जास्त काळजी घेत आहेत. यादव यांना पोटात दुखत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. त्यांच्या संपूर्ण टेस्ट झाल्यानंतरच आजाराचं खरं कारण कळेल असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांच्यामध्ये कोरोना सारखी काही लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांची चिंता वाढली होती. मात्र टेस्ट निगेटिव्ह आल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान प्रकृती साथ देत नसल्याने ते गेल्या काही वर्षांपासून राजकारणातही फारसे सक्रिय नाहीत. वाढतं वय आणि प्रकृतीच्या तक्रारी यामुळे त्यांच्या दौऱ्यांवरही बंधणं आली होती. त्यातच समाजवादी पक्षाचा कारभार हा आता अखिलेश यादवच बघत असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी नव्हती. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोजक्याच प्रचारसभा केल्या होत्या.