CoronaMumbaiNewsUpdate : मुंबईला जाण्याचा विचार करीत असाल तर आधी हे वाचा…

A 14 day home isolation for all domestic passengers arriving in Mumbai is a compulsory precaution against #coronavirus . Government officials desiring an exemption must write to [email protected] two working days prior to arrival, with work details #AtMumbaisService pic.twitter.com/SMCE2Ev1IM
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 7, 2020
कोरोना लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळात मुंबईला जाण्याचा विचार करीत असाल तर मुंबईत येणाऱ्या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणाऱ्या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावं लागणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही महापालिकेने कळवले आहे. दरम्यान ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने या गाईड लाईन्स जाही केल्या आहेत.