AurangabadCrimeNewsUpdate : मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल…

नाशिक रोडवरील औरंगाबादच्या भांगसीमाता गडाजवळील डोंगराच्या परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला धमकावून उचलून नेत दोन अज्ञात नराधमांनी बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना सायंकाळी साडेसहा वाजता भागतीमाता गडाच्या जंगलात घडली. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली असून पोलीस तपस करीत असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रांती चौक परिसरातील 20 वर्षीय तरुणी वडगाव कोल्हाटी येथील आपल्या मित्रांसोबत 4 ऑगस्टला दुचाकीने (क्र. एमएच 20481) भांगसीमाता गडावर फिरायला गेले होते. तेथे एका ठिकाणी गप्पा मारत असताना सायंकाळी साडेसहा वाजता दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी काहीही विचारपूस करता सरळ दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तरुणीला तिच्या मित्रासमोर बाजूच्या खड्ड्यामध्ये नेत जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या प्रकरणी दौलताबादच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे अधिक तपस करीत आहेत.