Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आधीच कोरोनाचे संकट त्यात रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू…. !!

Advertisements
Advertisements
Spread the love

आधीच लोक कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असतानाच  गुजरातमध्ये  एका कोरोनाग्रस्त रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत ८ कोरोनाग्रस्तांचा आगीत होरपळून मृत्यू झाला  असल्याचे ह्रदयद्रावक  वृत्त आहे. आगीनं रौद्र रुप धारण केल्यानं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या अहमदाबाद इथे नवरंगपुरा परिसरातील श्रेय रुग्णालयात भीषण आग लागली. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचललं मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यामुळे या आगीत होरपळून आयसीयूमधील ८ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

अहमदाबादेत श्रेय रुग्णालय हे कोविड-19 रुग्णांसाठी तयार करण्यात आले होते. या रुग्णालयात अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आयसीयूमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ८ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून उरलेल्या ३५ कोरोना रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 2.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!