चर्चेतली बातमी : दिशा सालियनच्या वडिलांची दिशांच्या विरोधात बोलणारांविषयी तक्रार….

अबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहची एक्स व्यवस्थापक दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा काही राजकीय नेत्यांनी केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या प्रकरणावर दिशांच्या वडिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे . सुशांतची एक्स मॅनेजर दिशा हिचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूसोबत जोडून पाहिला जात आहे आणि या कारणाने पोलीस आणि मीडिया सातत्याने दिशाच्या कुटुंबीयांशी संपर्क करीत होते. दिशाच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार मीडियातील लोक ज्याप्रमाणे त्यांना त्रास देत आहे आणि त्यांच्या मुलीबाबत खोटी बातमी पसरवत आहेत, यामुळे सुशांतच्या केसवर परिणाम होईल. शिवाय सालियन यांच्या कुटुंबीयांनाही याचा त्रास होत असल्याचे दिशाच्या वडिलांनी सांगितले.
दरम्यान अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतचे त्याच्या कुटुंबीयांशी पटायचे नाही. आपल्या जन्मदात्याच वडिलांसोबतच तो दूर राहत होता अशी माहितीसमोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणावरून राजकारण तापले आहे. पण, पोलीस तपासातून हळूहळू त्याच्याबद्दलच नवी माहिती आता त्याच्या कुटुंबीयांनी प्रकाशात आणली आहे. सुशांतच्या बहिणीचे पती ओ पी सिंग यांच्यासोबत सुशांतचे तर अजिबातच पटायचे नाही. तर दुसरीकडे सुशांत त्याच्या वडिलांना बोलणे तर दूर तो फक्त एसएमएस द्वारेच उत्तर द्यायचा. भाजप नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक दावे केले आहेत.