AurangabadBreakingNews : ED च्या छाप्यात मिठाई व्यावसायिकांच्या घरातून कोट्यावधींचे घबाड जप्त….

औरंंंगाबाद : शहरातील एका मिठाई व्यावसायिकाच्या घरात गुरुवारी (दि.३०) सकाळीच सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा मारला. या कारवाईदरम्यान पथकाने ६२ लाख रोख रक्कम व ७ किलो सोने ताब्यात घेतले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळाली. परकीय चलन विनियममधील संशयास्पद आर्थिक व्यवहारातून ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद शहरातील एका प्रतिष्ठीत आणि सिडको एन-३ भागात राहणार्या मिठाई व्यावसायिकाच्या घरावर सक्तवसूली संचालनालय विभागाच्या मुंबई येथील पथकाने छापा मारला. सकाळी सहा वाजेपासून सुरू झालेली कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाई दरम्यान, पथकाने व्यावसायीकाच्या घरातून ६२ लाख रूपये रोख रक्कम व ७ किलो वजनाचे सोन्याचे दागीने ताब्यात घेतले आहेत. तसेच अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही या पथकाच्या हाती लागले असून सायंकाळी उशिरापर्यंत सक्तवसूली संचालयानाचे अधिकारी व कर्मचारी कागदपत्रांची झाडाझडती घेत होते. दरम्यान, परकीय चलन विनियममधील संशयास्पद आर्थिक व्यवहारातून तसेच लाखो रूपयांची करचूकवेगिरी केल्याच्या संशयावरून ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.