IndiaNewsUpdate : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल…

Congress President Sonia Gandhi (in file pic) admitted today at 7 pm to Sir Ganga Ram Hospital. She has been admitted for routine tests and investigations. Her condition is currently stable: Dr D.S. Rana, Chairman (Board of Management), Sir Ganga Ram Hospital, Delhi pic.twitter.com/uldUxfLCJV
— ANI (@ANI) July 30, 2020
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त असून आज सायंकाळी 7 वाजता त्यांना नवी दिल्लीतील श्री गंगा राम हॉस्पिटल येथे नियमित चाचण्या आणि अधिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती श्री गंगा राम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डी.एस. राणा यांनी दिली आहे. सोनिया गांधी यांच्या नियमित चाचण्या आणि अधिक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्या रुग्णालयात दाखल झाल्याचे श्री गंगाराम रुग्णालयाच्या चेअरमनने म्हटले आहे. गुरुवारी सोनिया गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यसभा सदस्यांच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्र देण्याची मागणी करण्यात आली. मात्र राहुल गांधींना यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशानंतर त्यांना काँग्रेस अध्यपदावरुन राजीनामा दिला होता. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राफेल भारतात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी वायुसेनेचं अभिनंदन केलं, मात्र राफेलच्या किमतीवरुन त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलं. राफेलच्या वाढलेल्या किमतीबरोबरच अनेक प्रश्नांचं उत्तर त्यांनी मोदी सरकारला विचारलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही दिल्लीतील रुग्णांकडे होत असलेल्या निष्काळजीपणाबाबतही त्यांनी आवाज उठवला आहे.