CoronaMaharashtraUpdate : जेंव्हा बिल आले कळून तेंव्हा कोरोनाचा रुग्ण गेला पळून , मोठी रुग्णालये मोठी लूट !!

सरकारच्या दमदाटीमुळे म्हणा किंवा कर्तव्य म्हणून मुंबई, ठाणे , पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली मोठी लूट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एक तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात मुंबईच्या विरारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेत असलेला रुग्ण दीड लाखांचं बिल ऐकून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ रुग्णालयात 12 जुलै रोजी कोरोनावर उपचार घेण्यासाठी विरार परिसरात राहणाऱ्या एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पाच-सहा दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली होती. या उपचाराचं बिल दीड लाखाच्या आसपास असल्याचं रुग्णाला समजताच या रुग्णाने हॉस्पिटलच्या एचआरसोबत बोलण्याचा बहाणा करून रुग्णालयातून पळ काढला.
दरम्यान डॉक्टरांनी मला पुन्हा फोन केल्यावर मी सर्वाना बाधित करिन अशी धमकी देण्यात आली आहे. रुग्णालये उपचाराच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस या रुग्णाचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला होता. नाशिक शहरातील वोकहार्ट हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये 12 जुलैला रमेश करपे या रुग्णाला कोरोनाची लागण झाली म्हणून दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णालयाने अवघ्या 10 दिवसात या रुग्णाला तब्बल 3 लाख रुपयांच बिल आकारलं. विशेष म्हणजे हा रुग्ण 10 दिवस केवळ जनरल वॉर्डमध्ये अॅडमिट होता. या 10 दिवासात या रुग्णाला ना ICU ना व्हेंटिलेटर लावण्यात आलं. मात्र, तरीदेखील या हॉस्पिटनं हे अवाजवी बिल आकारलं गेलं.