CoronaIndiaUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा भारतीयांची आणि कोरोनाची आठवण , २७ जुलैला मुख्यमंत्र्यांशी बोलणार !!

On 27th July, PM Narendra Modi will inaugurate three new high-throughput labs of the Indian Council of Medical Research (ICMR) at Noida, Kolkata & Mumbai through video conference. CMs Yogi Adityanath, Mamata Banerjee & Uddhav Thackeray will also take part in the virtual event. pic.twitter.com/zALS6wfWEq
— ANI (@ANI) July 24, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार आहेत. येत्या २७ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही चर्चा आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिवदेखील उपस्थित राहतील. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही सातवी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत अनलॉक-२ नंतर पुढे काय? याविषयी विचार-विनिमय होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत करोनाशी दोन हात करण्यासाठी यापुढे कशी तयारी असायला हवी? राज्याची आणि केंद्राची यासाठी काय रणनीती असायला हवी? याबद्दल चर्चा होणार आहे.
दरम्यान आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण ४ लाख ४० हजार १३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८ लाख १७ हजार २०९ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. करोना संक्रमणात एकूण ३० हजार ६०१ जणांनी आत्तापर्यंत आपले प्राण गमावलेत. आत्तापर्यंत देशभरातील १२ लाख ८७ हजार ९४५ जणांना करोना संक्रमणानं गाठलंय. तर देशात सर्वाधिक करोना संक्रमण फैलावलेल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आज राज्यात एकूण ९६१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळलेत तर २७८ जणांचा मृत्यू झाला. आज तब्बल ५७१४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. यासोबतच राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७ वर पोहचलीय. यातील १ लाख ९९ हजार ९६७ जणांनी करोनावर मात केलीय तर १३ हजार १३२ जणांचा मृत्यू झालाय. एकट्या मुंबई शहरात शुक्रवारी एकाच दिवशी शहरात तब्बल १०६२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळलेत तर ५४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता ५९८१ वर पोहचलीय. दरम्यान शहरात आज तब्बल ११५८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.