AyoddhyaNewsUpdate : भूमिपूजनानिमित्ताने रामल्लाला ५ तारखेला मोठी भेट देताहेत पंतप्रधान

अयोध्येतील बहुचर्चित राममंदिराचे भूमिपूजन पीएमओ कार्यालयाने दिलेल्यामाहितीनुसार येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मोदी स्वत: अयोध्येत जाऊन हे भूमीपूजन करणार आहेत जेंव्हा कि आजवर बहुतेक कार्यक्रमाचे उदघाटन , भूमिपूजन त्यांनी ऑनलाईनच केले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्दयावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही नेत्यांच्या मते कोरोनाच्या कहरात राम मंदिरात भूमीपूजन करणे योग्य नाही. श्री राम मंदिराच्या भूमी पुजनात श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 40 किलो चांदी श्री राम शिलेला समर्पित करतील.
याबाबत बोलताना महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले की – राम मंदिराच्या शिलान्यासासाठी पंतप्रधान मोदींसह देशातील अनेक राजकीय व धार्मिक व्यक्तींना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. नृत्य गोपाल दास यांनी सांगितल्यानुसार संघाचे सर संघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शहा, राजधान सिंह यांच्यासह तब्बल 200 प्रमुख व्यक्ती अयोध्या राम मंदिर पुजनाच्या कार्यक्रमासाठी सहभागी होतील. दास यांनी सांगितले की यावेळी राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात करणारे नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.