AurangabadNewsUpdate : अफवांवर विश्वास ठेवू नका , आस्तिककुमार पांड्येय यांचे नागरिकांना आवाहन …

आज दि 15 जुलै रोजी मा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी पुंडलीकनगर येथील कंटेन्मेंट झोन ची पाहणी केली .यावेळी त्यांनी कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या बाबत संबधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना केल्या.यात प्रामुख्याने येत्या शनिवार किंवा रविवार रोजी कंटेन्मेंट झोन मधील सर्व नागरिकांची अँटीजन टेस्टिंग करण्यात यावी .कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्यवस्थित होतो की नाही यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे.
यावेळी त्यांनी कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या आरोग्यासाठी हे प्रयत्न करत आहोत ,ICMR च्या गाईड लाईन नुसार आम्ही काम करत आहोत यात कोणाचाही वयक्तिक हेतू नाही.लवकरच हे संकट दूर होणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रविवारी जनता कर्फ्यु उघडणार आहे तेव्हा नागरिकांनी लगेचच घराबाहेर पडू नका आवश्यक असेल तरच घरातील एकाच व्यक्तीने मास्क घालून ,सॅनिटायझर सोबत ठेऊनच आणि सोशल डिस्टन्स चे पालन करूनच घराबाहेर पडावे नसता परत पहिल्या सारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही .तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आम्ही सर्व जण आपल्या आरोग्यासाठी व सुरक्षितते साठी रस्त्यावर उतरून लढत आहोत तेव्हा आपण सर्व नागरिकांनी महानगरपालिका करत असलेल्या उपाय योजने साठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
यावेळी त्यांचे समवेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख श्री नंदकिशोर भोंबे ,वार्ड अधिकारी श्री महावीर पाटणी ,श्रीमती मीरा चव्हाण, पुंडलीकनगर पोलीस स्टेशन निरीक्षक श्री घनश्याम सोनवणे,नियुक्त केलेले महसूल विभागाचे अधिकारी ,कर्मचारी ,पोलीस कर्मचारी ,मनपा आरोग्य विभाग ,घनकचरा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.