RajasthanPoliticalCrises : सचिन पायलट यांना बंडामुळे चांगलाच दंड पडला…

राजस्थान काँग्रेसने बंडखोर नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून, तसेच राजस्थान प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. तसेच सचिन पायलट यांना काँग्रेस युथच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुनही हटवले आहे. त्यांच्या जागी आता गोविंद सिंह डोटासरा यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. या बरोबरच पायलट यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना देखील मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
Rajasthan: Sachin Pilot's nameplate removed from Congress headquarter in Jaipur after he was removed as Deputy CM and PCC Chief, Govind Singh Dotasra appointed as state unit chief. pic.twitter.com/m0Nzd6iSD3
— ANI (@ANI) July 14, 2020
राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्यासाठी सचिन पायलट यांनी बंड पुकारले आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. पण, काँग्रेसने जुने जानते नेते अशोक गहलोत यांच्यावर विश्वास दाखवत पायलट यांच्यावर कारवाई केली आहे.
#WATCH Congress party has decided to remove Sachin Pilot as Deputy CM and Rajasthan PCC Chief. Vishvender Singh & Ramesh Meena removed as Ministers: Congress leader Randeep Singh Surjewala #Rajasthan pic.twitter.com/sJHmE9kI3T
— ANI (@ANI) July 14, 2020
त्याआधी सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्यापासून ते अहमद पटेल यांनी सर्वांनी प्रयत्न केले. पण, सचिन पायलट हे अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता मनधरणीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. अखेरीस पायलट यांनी गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन कधी हटवणार आणि आपल्याला कधी मुख्यमंत्री करणार असे आश्वसान तरी द्यावे, अशी शेवटची मागणी पक्षाकडे केली. पण, पक्षाने त्यांना सीएलपीच्या बैठकीला जाण्याचा सल्ला दिला. तसेच या बैठकीनंतर गहलोत यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. पण, पायलट यांनी बैठकीला जाण्यास नकार दिला.
दरम्यान, रविवारी रात्रीपासून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी वारंवार फोनवर संवाद साधून त्यांची मनधरणी केली. सर्वच नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही पायलट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर त्यांच्यावर कारवाई करत उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आता राजकारणात सक्रीय झाली आहे.
भाजप राजकारणात सक्रीय
सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजपने बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, राष्ट्रीय संघटन मंत्री वी.सतीश, गुलाबचंद कटारिया, उपनेता प्रतिपक्ष राजेंद्र आणि प्रदेश संघटन महामंत्री चंद्रशेखर हजर आहे. या बैठकीमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागण्यावर चर्चा होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर हे दिल्लीवरुन जयपूरला रवाना झाले आहे.
तर दुसरीकडे अशोक गहलोत यांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यांनी 105 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच पायलट यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहे. तसेच राजभवनात काँग्रेसच्या आमदारांची परेड होण्याची शक्यता आहे. राजभवनावर गहलोत पोहोचले असून त्यांनी आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे.