CoronaEffect : कोरोना रुग्णाच्या हातात दिले चक्क २८ लाखांचे बिल !!!

अनेक खासगी रुग्णालयांना कोरोनाचा संसर्ग म्हणजे पैसे मिळवण्याचे साधन वाटत आहे. सरकारने कोविड – 19 च्या उपचारासाठी कितीही दर निश्चित केले तरीही या रुग्णालयांची मनमानी थांबत नाही. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाने कोरोना रूग्णाच्या उपचारासाठी 28 लाखांचे बिल दिलं आहे.
कोरोनाच्या संकट काळात अशा डॉक्टरांवर बर्याचदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही खासगी रुग्णालये रुग्णांच्या असहायतेचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहेत. एकीकडे कोरोना साथीत जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणारेही डॉक्टरच आहेत आणि रुग्णांच्या असहायतेचा फायदा घेऊन लुटणारेही डॉक्टरच आहेत . या पवित्र पेशाशी संबंधित काही लोक अजूनही पांढर्या कपड्यांच्या मागे काळा पैसा मिळविण्याच्या उद्देशाने कार्यरत आहेत. हे प्रकरण गुरुग्रामचे आहे. मेदांता रुग्णालयावर असे आरोप आहेत की उपचाराची संपूर्ण रक्कम न दिल्याने रुग्णास सोडण्यात आले नाही. कोरोना रूग्णाच्या 40 दिवसांच्या उपचाराचे बिल 28 लाख केले, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान केंद्र सरकारने कोरोना साथीच्या आजारावरील उपचारांची किंमत निश्चित केली होती, परंतु अद्यापही खासगी रुग्णालयांकडून उपचाराचाच्या नावाखाली लूटीच्या अनेक घटना समोर येत आहेत. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गुरुग्राममधील हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.