IndiaCoronaVirusUpdate : कोरोनाच्या वॅक्सीनवर काम सुरू , २०२१ पर्यंत लास येण्याची शक्यता,

कोरोना व्हायरसचा कहर सर्वत्र सुरू असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वॅक्सीनवर काम सुरू आहे. भारतातही 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचं वॅक्सीन लाँच करण्यात येईल असं सांगण्यात येत आहेत. मात्र संसदीय समितील दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस 2021 आधी उपलब्ध करून देणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी 2021 साल उजाडेल असाही कयास आहे.
दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षा कोरोनाची लस तयार करून ती सर्वत्र उपलब्ध करणं शक्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2021च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होऊ शकेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत या संदर्भात खुलासा करण्यात आला. कोरोना आणि इतर साथीच्या आजारांशी भविष्यातील व्यवहार करण्याची तयारी या बैठकीचा अजेंडा होता.
शुक्रवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या लसीच्या निर्मितीसंदर्भात चर्चा करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन नावाची कोरोनाची लस येऊ शकते असं सांगण्यात येत आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. 7 जुलैला मानवी चाचणी करण्यात आली. त्यामुळे ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होते का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.