CoronaVirusUpdate : महाराष्ट्राच्या राजभवनावरही कोरोनाची धडक , 16 कर्मचारी पॉझिटिव्ह , राज्यपाल राज्यपाल स्वत: क्वारंटाईन

मुंबईत कोरोनाचा कहर चालूच असून मंत्रालय , पोलीस दल, महापालिका आणि आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाईन राहत आहे.